तार तुटून मोठी आग, धोका होण्याची शक्यता टळली
कासार बालकुंदा:{मारुती लोहार} निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तांबाळा येथे जाणारी मुख्य लाईटचि तार जमिनीवरती पडल्याने मोठ्या प्रमाणात आग लागली होती. तसेच तारे जमिनीवरती पडल्याने रस्त्यावरील वाहने व नागरिकांना धोका निर्माण झाला होता. जमिनीवर तार तुटून पडली तरी महावितरण कासार बालकुंदा कार्यालयातून लाईट बंद केली नाही. काही नुकसान झाल्यास महावितरण कंपनी जबाबदार असेल असे पत्र ग्रामपंचायत कार्यालय तांबाळा यांनी काढले होते. महावितरण कंपनी लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावी अन्यथा नुकसान झाले असे सर्वस्वी जवाबदार महावितरण कंपनी असे अर्ज देखील देण्यात आली होते.
0 Comments