चाकुर शहर १००% बंद; महाविकास आघाडीच्या बंदला व्यापाऱ्यांनी दिला प्रतिसाद
तहसिलदार शिवानंद बिडवे यांनी मागणीचे निवेदन स्वीकारले
चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} केंद्र शासनाने लागु केलेल्या शेतकरी विरोधी कायदयाच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.चाकूर शाहरात महाविकास आघाडीच्या वतीने चाकुर बंदचे आहवान करण्यात आले होते.चाकुर शहरातील व्यापाऱ्याने शंभर टक्के बंद पाळुन आंदोलनाला पाठिंबा दशिवला.चाकुर कृषि उत्पन्न बाजार समिती पासुन मुख्य रस्त्यावर वरुन नवीन बसस्थानक समोरुन मेन रोड मार्गे जुने बस्थानक वर येऊन समारोप झाले. चाकुर तहसिलदार शिवानंद बिडवे यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले.दिल्ली येथील आंदोलनकत्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आला असुन त्यानुसार कार्यकत्यांनी दुकाने बंद ठेवण्याचे आहवान करीत फेरी काढली.नविन कृषी कायदा रद्द करावा'शेतमालाला हभी भाव मिळविण्यासाठी कायदेशीर तरतुद करावी,स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी नुसार कार्यवाही करावी,आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख सुभाष काटे,राष्ट्रवादी चाकुर तालुका अध्यक्ष शिवाजी काळे,चाकुर कॉग्रेस शहर अध्यक्ष सय्यद मुर्तुजा अली,नगरसेवक गोपाळ माने,इलीयास सय्यद,अंगद पवार,युवक कॉग्रेस अध्यक्ष निलेश देशमुख,शिवसेना तालुका प्रमुख गुणवंत पाटील,गणेश फुलारी,शहर अध्यक्ष राष्ट्रवादी,युवक राष्ट्रवादी अध्यक्ष राहुल सुरवसे,माजी सरपंच गंगाधर केराळे,माजी सरपंच सिताराम मोठेराव,कॉग्रेस युवक लातुर सरचिटणीस भागवत फुले,अनिल शंके, रियाज पठाण,साजीद शेख,गफुर मासुलदार,बिलाल पठाण,बाबुराव शेटे,सुधाकर पताळे,सुनील शिंदे,प्रकाश पटणे,समीर शेख विद्यार्थी कॉग्रेस तालुका अध्यक्ष,बाळासाहेब भोसले,शरद जाधव,महादेव शिंदे,भागवंत सुर्यवंशी,बालाजी शेळके शंकर कांबळे,पांडुरंग सतीश,पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आले होते.चाकुर बिट अंमलदार रामचंद्र गुंडरे,बाळासाहेब आरदवाड,ज्ञानेश्वर जोशी,पोलीस बंदोबस्त उपस्थित होते.
0 Comments