Latest News

6/recent/ticker-posts

मुस्लिम आरक्षणाचा निर्णय हिवाळी अधिवेशनात घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडु

मुस्लिम आरक्षणाचा निर्णय हिवाळी अधिवेशनात घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडु

आष्टी:{प्रतिनिधी/डॉ.नदीम शेख} दि.११ - मागील अनेक वर्षांपासून मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात चालत आला आहे. यापूर्वीच्या सरकारने मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.मात्र भाजप सरकारने तो रद्द ठरवला. व मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.मात्र हा निर्णय देखील कोर्टामध्ये टिकला नाही.दोन्ही समाजाने आरक्षणासाठी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढला होता.यात मराठा समाजाला आरक्षण मिळाले देखील होते. मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये या आरक्षणाला अहवान दिल्यानंतर आरक्षणास स्थगिती दिली होती.परत मराठा समाज ज्या पद्धतीने सुरुवातीला मूक मोर्चे ,आंदोलने केली त्याच पद्धतीचे आंदोलन सद्यस्थितीमध्ये मराठा समाज करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला होता आणि मुस्लीम समाजाचा सतत मराठा समाजाला पाठिंबा राहील अशा पद्धतीचे धोरण आज पर्यंत मुस्लिम समाजाचे राहिले आहे. मात्र मुस्लिम समाजाकडे फक्त राजकीय हेतू साध्य करण्यापुरते यांचा वापर करून सत्ता प्राप्त केली जाते. परत या समाजाकडे लक्ष दिले जात नाही. या गोष्टीकडे मुस्लिम समाजाने गांभीर्याने पाहिले. सुरुवातीला शांत रीतीने मूक मोर्चे काढून आपली मागणी शासन दरबारी मांडण्याचा नेहमी प्रयत्न केला. या समाजाची आर्थिक परिस्थिती पाहिली असता ती खूप खालावलेली आहे. या सर्व बाबीचा विचार करून माननीय मुख्यमंत्री यांना एक निवेदन दिले आहे. ज्यामध्ये  हिवाळी अधिवेशनात मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन आक्रमक केले जाईल. असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनामध्ये प्रामुख्याने 

   समाजाची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती पाहता संवैधानिक कायदा करून दहा टक्के आरक्षण द्यावे.

      मुस्लिम आरक्षणाचा कायदा लागू होत नाही तोपर्यंत आरक्षणाचा अध्यादेश काढावा.

    २०२० पासून पुढे सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रियेत दहा टक्के आरक्षण ठेवावे.

      सर्व नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण ठेवावे.

       मुस्लिमांवर  हल्ले माॅबलिंचींग, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ॲट्रॉसिटी चा कायदा लागू करावा.

   या सर्व मागण्यांचा विचार करून ताबडतोब निर्णय घ्यावा अन्यथा आरक्षणासाठी आक्रमकरीत्या आंदोलन छेडले जाईल असा इशारा मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण महत्त्वाचे आणि त्यासाठी  सद्यस्थितीत आरक्षण महत्त्वाचे समाजकारणी,राजकारणी आणि सुशिक्षित लोकांचे समाजाप्रती असलेले कर्तव्य म्हणजे येणाऱ्या पीढीसाठी शिक्षण मार्ग सवलतीचे करणे त्याचाच भाग म्हणून आज महाराष्ट्रात प्रत्येक तहसील कार्यालय तसेच कलेक्टर आॕफीसला एकाच दिवशी मुस्लिम आरक्षणाचे निवेदन देण्यात आले त्या निमित्ताने तहसील कार्यालय आष्टी येथे उपस्थीत मुस्लिम समाजबांधव आणि नायब तहसीलदार श्रीमती निलीमा थेऊरकर मॕडम यांना निवेदन दिले या निवेदनावर डॉ. नईम शेख, मुदस्सर रहीम सय्यद, खालील बीरआली कुर्दुस, मिर्झा निशांत बेग,जुनेद नईम ताबोळी, जीशान बेग, वसीम शहिद शेख, शाहरुख रहीम शेख, इमाम अमीन शेख, आयुब शहनावाज शेख, मनसुर मुबारक शेख, अल्ताफ अफसर शेख, अझर सादिक शेख, इम्रान बादशाह शेख, ए ए तांबोळी, समशेर खान पठाण, जीशान अली काझी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments