शिबिरांच्या माध्यमातून लढवय्या तरुण नेतृत्वाची उभारणी करणार- निलेश विश्वकर्मा
लातूर:(प्रतिनिधी) दि.१७ - वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब अंाबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या,राज्यातील तरुण-तरुणींची शिबिरे घेवून त्यातून सामाजिक,राजकीय,उद्योंगी नेतृत्वाचे गुण असलेले तरुण पुढे आणून त्यांना उभारी देत सक्षम राजकारण करणात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. निलेश विश्वकर्मा हे महाराष्ट्रातील दुसर्या टप्प्यातील पक्ष बांधणी,युवकांचे संघटनासाठी राज्याच्या दौर्यावर असून, त्यांनी आज लातूर येथे पत्रकारांनी संवाद साधला. देश,समाजासाठी आपण काहीतरी करु शकतो ही भावना असलेल्या तरुण-तरुणींना वंचित बहुजन आघाडी शिबीर -संवादाच्या माध्यमातून एकत्रित करत, त्यांच्यात निष्ठेचे समाजकारण,राजकारण आणि उद्योगशिलता निर्माण करण्यासाठी शिबिराच्या माध्यमातून जोडण्यात येत आहे.त्याला राज्यात चांगला प्रतिसाद मिळतो आहे,आमचे सदस्य होण्यासाठी थेट अथवा ऑनलाईन संपर्क करता येणार आहे. गाव तिथे रोजगार हे धोरण घेवून,तरुणांना स्वावलंबी,उद्योगी,तसेच पक्का राजकीय बेस असलेले पुढच्या पंचवीस वर्षाचे राजकीय नियोजन करुन लढणारे कार्यकर्ते,बनविण्यात येणार आहे. गेल्या पंचेवीस वर्षात राज्यात आणि मराठवाड्यात राज्यकर्त्यांनी गचाळ राजकारण केले,त्याचा परिपाक आज हवा तसा नागरी सुविधा,पायाभूत विकास झालेला नाही, एमआयडीसी ओस पडल्या आहेत, रस्ते बकला झाले आहेत असेे ते म्हणाले. शैक्षणिक कालावधीत मागास,इतर मागासवर्गीय, व भटके विमुक्तांना भारत सरकाराने शिष्यवृत्तीची सुविधा केली असली तरी अलिकडील काळात ती त्या-त्या शैक्षणिक वर्षात दिली जात नाही,हे सरकारांचे नाकर्तेपण आहे. त्यावर पक्षाची सम्यक विंग आवाज उठवत आहे असे त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अनुसूचीत जाती, जमाती बरोबरच अल्पसंख्याक,इतर मागसवर्गीय समाजातील तरुण, कार्यकर्तेे जोडले जात आहेत,त्यांना पदाधिकारीच नव्हे तर थेट उमेदवारी देवून आपणही राजकारण करु शकतो असा विश्वास निर्माण करण्यात येत आहे,असेही विश्वकर्मा यांनी संागितले. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, प्रदेश सदस्य तथा लातूर जिल्हा निरीक्षक रविकांत राठोड, प्रदेश सदस्य अभय बनसोडे, मराठवाडा महासचिव रमशे गायकवाड, ऍड. सचिन जोरे, लातूर जिल्हा महासचिव तात्याराव वाघमारे,जिल्हा संघटक सचिन लामतूरे, प्रा.कल्याण कांबळे, वैभव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज तेली,जिल्हा उपाध्यक्ष कांबळे, ऍड.सुभेदार मादळे, ऍड.रोहित सोमवंशी, महेंद्र बनसोडे, गजधने,बालाजी कांबळे आदी उपस्थित होते.
0 Comments