निलंगा ते बुजरुग्वाडी मार्ग नळेगाव शटल एस. टी.बस सेवा सुरू करा - नागरिकांची व विद्यार्थ्यांची मागणी
निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) कोरोना लाकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून शाळा , महाविद्यालय , सामान्य नागरिकांचे काही खाजगी कामे सर्व काही बंद होते. आता शाळा , महाविद्यालय चालू झाले आहेत त्यामुळे निलंगा ते नळेगाव सकाळी निलंगा येथून साडेआठ वाजता गाडी निघते ती गाडी बुजरुग्वाडी मार्गे सोडण्यात यावी अशी जनतेची व विद्यार्थ्यांची मागणी आहे तरी हि गाडी सोमवार पासुन चालू करण्यात यावी बुजरुग्वाडी गावातून सोडावी व बुजरुग्वाडी मार्गावर वाहतूक कमी असल्यामुळे सामान्य नागरिकांना व विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे व विद्यार्थ्यांच्या शाळेचा वेळ विचारात घेऊन या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढवण्यात यावी या मागणीकडे आगार प्रमुखांनी व लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून लवकरात लवकर बस सेवा सुरू करतील अशी अपेक्षा नागरिकांतून व विद्यार्थ्यांतुन होत आहे.
0 Comments