Latest News

6/recent/ticker-posts

भादेकर करत आहेत अनेक समस्यांचा सामना; पाणी असतानाही हाल होत आहेत पाण्याविना

भादेकर करत आहेत अनेक समस्यांचा सामना; पाणी असतानाही हाल होत आहेत पाण्याविना

लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी जी शेख) दि.२३ - सध्या ग्राम पंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने आजी माजी आणि भावी पुढारी सर्वच राजकीय फडात व्यस्त आणि मस्त असतानाच नागरिक मात्र पाण्यासाठी वन वन भटकताना त्रस्त दिसत आहेत असे हाल बेहाल भादेकरांचे सुरु आहेत. औसा तालुक्यातील भादा हे गाव दहा हजार लोकसंख्येच्या जवळपास असल्याने आणि भूकंपानंतर ठिकाणी ही वस्ती प्रत्येकाच्या  सोयीनुसार वसली असल्याने या ठिकाणच्या नागरी सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायतला मोठी कसरत करावी लागते यामुळे या गावातील जुने गाव,वरवडा रोड,शिवाजी नगर आदी भागात तर समस्या बाराही महिने संपत नसल्याची प्रचिती गावातील प्रत्येक नागरिकांना सतत जाणवत असते तरीही याठिकाणी सेवा सुविधा पुरविण्यासाठी हे माजी सरपंच,उपसरपंच यांनी मोठी काटकसर करून समस्या सोडविण्यासाठी "गावाच्या सेवेसाठी  काय पण"प्रयत्न केल्याचे जाणवते तरीही सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची'घटिका'जवळ आल्याने सध्या पाण्याऐवजी त्यांनी ग्रामपंचायत घटिकेच्या अभ्यासात जास्त व्यस्त असल्याचे चर्चा गावात सुरु आहे. तर गावाला पाणीपुरवठा करणारी योजना की गावापासून गावापासून जवळपास पाच ते सहा किमी अंतरावर असल्याने ही योजना विस्कळीत करण्यासाठी अनेकांना अवधी भेटतो आणि यामुळे या पाणीपुरवठा योजनेचा सतत बोजवारा उडतो यामुळे पाणीपुरवठा अनेक वेळा खंडित होऊन गावांमध्ये पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनाविरोधात पाणी खंडित होऊन गावांमध्ये पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनाविरोधात आक्रोश निर्माण होतो ही समस्या सोडविण्यासाठी गावाजवळच नवीनच खोदकाम सुरु असलेली नूतन सार्वजनिक विहीर लवकरच पूर्ण करून ती कार्यान्वित करणे गरजेचे असल्याचे नागरिक बोलत असून नागरिक बोलत असून या योजनेला खोडा घालण्यापूर्वीच हि योजना पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत सर्व जवाबादरीने पुढे येणे आवश्यक आ- भादा गावच्या बाबतीमध्ये कोणतीही समस्या पुढे निराकरण केले नाही तोपर्यंत पाठीमागून समस्या  सुरू होते जसे पाणीपुरवठा योजना,विद्युत रोषणाई,रस्तेची प्रक्रिया ही सतत पुढे पाठ मागे सपाट अशाच पद्धतीची भादेकरासाठी सतत जाणवत असते.

【   】गावाला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन आणि विद्युत पुरवठा करणारे रोहित्र याच्या बिघाडामुळे गावाची पाण्याची समस्या निर्माण झाली होती आता सर्व दुरुस्त झाले असून पाणी पूरवठा सुरळीत चालू राहील याची व्यवस्था करण्यात आली आहे.

-माणिक सूर्यवंशी,ग्रामविकास अधिकारी,भादा ता औसा.

Post a Comment

0 Comments