हजरत सुरतशहावलींचा उर्स कोरोनामुळे फक्त धार्मिक कार्यक्रम होणार
लातूर:(प्रतिनिधी) येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान हजरत सुरतशहावली यांचा ३८२ वा उर्स यंदा कोरोनामुळे फक्त धार्मिकांनी साजरा करण्याचा निर्णय नसीरभाई पानवाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला़. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी द़ि १६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता गुसूलचा कार्यक्रम होईल़ द़ि १७ डिसेंबर रोजी दुपारी संदलचा कार्यक्रम होणार आहे़ हा कार्यक्रम फक्त प्रमुख पाहूणे, मुजावर, मौलाना, काझी यांच्याच उपस्थितीत होणार आहे़ कोरोना संक्रमणाचा काळ असल्यामुळे कव्वाली, मुशायरा, वाजबयान व आतषबाजी असे गर्दी होणारे कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आलेले आहेत़ या बैठकीस नरेंद्र अग्रवाल, चॉदपाशा इनामदार, रमेशसिंह बिसेन, ऍड़ फारुक शेख, संजय म्हेत्रे, मुन्ना राजे,जमील मिस्त्री, शेख शब्बीर, शेख खय्युम, गोरोबा लोखंडे, अखिल शेख, शहाजी चव्हाण, कपील तिवारी, मुख्तार सय्यद, कच्छी नांदेडवाले, युनूस मुजावर, हक्कानी मुजावर, के़ जी़ एऩ डेकोरेशनवाले, निसार काझी, मुर्शिद सय्यद, मोहसीन, मौलाना महंमदअली उपस्थित होते़ गेल्या वर्षीची उर्स कमिटी या वर्षीच्या मुजावर कमिटीला मदत करेल, असे दर्ग्याचे मुजावर युसूफ, ख्वॉजाभाई, चॉंदपाशाभाई, शफिकभाई, मैनोद्दिनभाई, समीउल्लाभाई, तौफिकभाई यांच्या वतीने कळविण्यात आले आहे़ कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांची रेल्वे समिती सल्लागार पदी निवड झाल्याबद्दल अल्पसंख्यांक कॉंग्रेसने सत्कार यांची केंद्रीय रेल्वे समिती सल्लागार पदी निवड झाल्याबद्दल लातूर जिल्हा अल्पसंख्यांक कॉंग्रेस च्या वतीने सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी लातूर जिल्हा अल्पसंख्यांक कॉंग्रेस चे अध्यक्ष रफिक सय्यद, जिल्हा महासचिव अल्ताफ शेख, संघटक खदिर भाई शेख, लातूर शहर कॉंग्रेस कार्यालय प्रमुख ऍड देविदास बोरुळे पाटील , सरचिटणीस अलीम शेख, अविनाश बट्टेवार आदी उपस्थित होते.
0 Comments