ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर;चाकुर तालुक्यात २४ ग्रामपंचायतीची होणार निवडणूक
चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असुन १५ जानेवारी मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती चाकुर तालुक्याचे तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी दिली.राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवार दि.११ रोजी याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे.१५ डिसेंबर रोजी तहसिलदार निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत.२३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधित नामनिर्देशन पञ विक्री व स्वीकारली जाणार आहेत.३१ डिसेंबर प्राप्त नामनिर्देशन पञाची छाननी करण्यात येणार आहे.४ जानेवारी 2021 रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असुन त्याच दिवशी दुपारी चिन्हाचे वाटप होणार आहेत.१५ जानेवारी रोजी सकाळी ९ -३० ते यायंकाळी ५-३० वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार असुन १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
चाकुर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार आहेत.प्रामुख्याने नळेगांव,वडवळ नागनाथ,रोहिणा,कबनसांगवी,शेळगाव,केंद्रेवाडी,महाळंगी,हाडोळी,झरी [खु], ब्रम्हमवाडी,कडमुळी,दापक्याळ,जगळपुर,शिवणखेड,अजनसोंडा [बु], राचन्नावाडी,टाकळगाव,बोरगाव,महाळंग्रा,नागेशवाडी,उजळंब,बावलगाव,लिंबाळवाडी,महाळंग्रावाडी,या गावात होणार निवडणूक
0 Comments