Latest News

6/recent/ticker-posts

माजी सहाय्यक आयुक्त संग्राम जमालपुरे यांंचा आम आदमी पार्टीत प्रवेश

माजी सहाय्यक आयुक्त संग्राम जमालपुरे यांंचा आम आदमी पार्टीत प्रवेश


लातूर:(शहर प्रतिनिधी/ओमकार गोटेकर) केंद्रीय उत्पाद शुल्क ,सीमा शुल्क माल एवं सेवा कर  विभाग सीजीएसटी(आयआरएस) चे माजी सहाय्यक आयुक्त संग्राम माधवराव जमालपुरे यांनी सोमवार,दि.२१ डिसेंबर २०२० रोजी आम आदमी पार्टीच्या लातूर येथील झालेल्या  विभागीय बैठकीत प्रवेश केला.त्यांचे आप प्रदेश संयोजक रंगा राचूरे,राज्य सचिव धनंजय शिंदे, मराठवाडा विभाग अध्यक्ष डॉ.सुभाष माने,सचिव अनिल धवले,आप युवा प्रदेशाध्यक्ष इंजि.अजिंक्य शिंदे यांच्या उपस्थित आप मध्ये प्रवेश केला. आप पक्ष प्रवेशानंतर मनोगत व्यक्त करताना संग्राम जमालपुरे यंानी आपचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात दिल्लीत होत असलेल्या लोकोपयोगी कामाने आपण प्रभावी होवून आपमध्ये प्रवेश केला असून, महाराष्ट्रात आप चा विस्तार,संघटनासाठी आपण कटिबध्द राहू असे सांगितले. आप प्रदेश संयोजक रंगा राचूरे यांनी संग्राम जमालपुरे यंांच्या प्रशासकीय कामांचा पक्ष आणि राज्यातील राजकारणाला नवी उभारी मिळेल असा,आशावाद व्यक्त करुन त्यांचे आपची टोपी घालून स्वागत केले. संग्राम जमालपुरे हे मुळचे दैठणा,ता.शिरुर अनंतपाळ येथील रहिवाशी असून, बॉटनी एम.एस्सी आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून त्यांची १९८२ ला सेट्रल एक्साईज अँड कस्टममध्ये निरीक्षक म्हणून निवड झाली.२००१ मध्ये ते अधीक्षक म्हणून पदोन्नती झाली. २०१४ मध्ये त्यांना आयआरएस मिळाल्यानंतर त्यांना सहाय्यक आयुक्त म्हणून कामाची संधी मिळाली.आणि २०१८ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.त्यांनी नादेड, औरंगाबाद,लातूर ,बीड,सोलापूर या जिल्ह्यात वरील सेवाकाल पूर्ण केलेला आहे.आम आदमी पार्टीच्या लोकाभिमुख कार्यपध्दतीमुळे व त्यांच्या दिल्लीतील इतर सहकार्‍यांच्या सूचनेमुळे आप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेवून,सोमवार,दि.२१ डिसेंबर २०२० रोजी ते आम आदमी पार्टीत दाखल झाले. संग्राम जमालपुरे यांच्या पक्ष प्रवेशाचे आप प्रदेशाध्यक्ष रंगा राचूरे,सचिव धनंजय शिंदे,मराठवाडा विभाग अध्यक्ष डॉ.सुभाष माने,सचिव अनिल धवले,आप युवा प्रदेशाध्यक्ष इंजि.अजिंक्य शिंदे,लातूर जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले,सचिव सैदोद्दीन सय्यद,दिपक कानेकर,शिवलींग गुजर,सुमित दीक्षित,बाळ होळीकर,हरी गोटेकर,अमित पांडे,शाम माने,मेजर आनंदा कामगुंडा,मनोहर पाटील आदिंनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments