तुरीवर पडलेल्या मर रोगाबाबत चाकुर तालुक्यात जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी केली पाहणी
चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} शेतकऱ्यांना अनेक संकटातून जाऊन आपले जिवन जगावे लागत आहेत.मागील कांही दिवसांपुर्वी लातुर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.हातातोंडाशी आलेला सोयाबीन पिक हातातुन गेले.शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.त्यातुन कसेबसे शेतकरी मार्ग काढत असताना पुन्हा शेतकऱ्यांना वर संकट आले.वातावरणातील बदला मुळे तुरी पिकांचे खराटा झाला आहे.त्यातच चाकुर तालुक्यात तुरीवर मर रोगामुळे उत्पन्नात मोठी घट होणार आहे.शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत येणार आहे. जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी चाकुर तालुक्यातील तुरीवर पडलेल्या मर रोगाची पाहणी केली.यावेळी त्यांच्या सोबत कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते. आज दिनांक 18 डिसेंबर 2020 करण्यासाठी रोजी चाकूर तालुक्यातील मौ. महालांगरा , आष्टा येथे तुर पिकामध्ये येत असलेल्या मर रोगाबाबत पाहणी बी.पी. पृथ्वीराज जिल्हाधिकारी लातूर, विकास पाटील सर संचालक (विस्तार ) ,पुणे टी एन जगताप सर ,वि कृ स सं , लातूर , दत्तात्रय गावसाने , जि अ कृ अ , लातूर अरुण गुट्टे सर कृषी विद्यवेता , डॉ.शिवानंद बिडवे तहसिलदार चाकुर,भुजंग पवार कृषि अधिकारी चाकुर, लातूर संदीप देशमुख , तीर्थंकर , उ वि कृ अ , उदगीर , मा कदम सर , उ वि कृ अ , लातूर यांनी केली.
0 Comments