शेतकरी आंदोलनाच्या समरणार्थ शेतकर्यांचा सत्कार
नांदेड:(प्रतिनिधी) दि. 5 सध्या देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर लाखोंच्या संख्येत शेतकरी वर्ग नवीन कृषिकायद्याच्या विरोधात आंदोलन करीत आहे. वरील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी युवक कांग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष स. लखनसिंघ लांगरी यांनी दि. 4 डिसेम्बर रोजी सायंकाळी कामठा (खुर्द ) गावातील शेतकऱ्यांचे सत्कार केले. या वेळी लखनसिंघ लांगरी आणि कृष्णा पाटिल पूयड यांच्या वतीने कृषि भूमि पूजन, औजार पूजन आणि पशु पूजनही केले. देशाचा कृषि कायदा शेतकरी हिताचा व्हावा, कृषि कायद्यामुळे शेतकरी वर्ग समृद्ध व्हावा अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली. या प्रसंगी शेतकरी श्रीकांत पाटिल जनोळे, ज्ञानेश्वर पाटिल जानोळे, कोंडीबा पाटिल इंगळे, फिरोज खान, सीताराम स्वामी, चांदु गायकवाड, लखन पाटिल पूयड, चंद्रकांत रामजी शिडके, सुमेध बालाजी सरपाते, संजय गोमतकर, अंकुश मांजरे सह अनेक शेतकऱ्यांचे सिरेपाव देऊन सत्कार करण्यात आले. गावातील नागरिक या सत्काराने भाराहून गेले. आम्ही शेतकरी आन्दोलनास नांदेड येथून पाठिंबा देत आहोत. केंद्र शासनाने शेतकर्यांच्या हिताचा कायदा करावा अशी मागणी लखन सिंघ लांगरी यांनी केली आहे.
0 Comments