Latest News

6/recent/ticker-posts

ग्रामीण भागातील होतकरु खेडाळुना प्रोहसान मिळावा म्हणून सी.पी.एल.चे आयोजन

ग्रामीण भागातील होतकरु खेडाळुना प्रोहसान मिळावा म्हणून सी.पी.एल.चे आयोजन

तब्बल 100000 लाख रुपयांचे बक्षीस, 51,000/ राधाकिशन तेलंग यांच्या वतीने

चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} चाकुर तालुक्यातील खेळाडुंना प्रोत्सान मिळावे यासाठी चाकुर शहरात रणजी क्रिकेट  संघाच्या वतीने चाकुर प्रिमीअर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेमध्ये एक लाख रुपयापेक्षा जास्त बक्षिसे ठेवण्यात आली असुन या भव्य स्पर्धेचे उध्दाटन अहमदपुर-चाकुर विधानसभेचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. चाकुर प्रिमीअर लिग स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 51 हजार रुपये व चषक माजी कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती युवा नेते राधाकिशन तेलंग यांच्या वतीने देण्यात येणार आहे.साई क्लिनीक लॕबोरेटरीचे संचालक शिवदर्शन स्वामी यांच्या वतीने 31 हजार रुपये ठेवण्यात आले आहे.उत्कृष्ट गोलंदाज,उत्कृष्ट फलदांज,मँन अॉफ द मॕच,मॕन अॉफ द सिरीज ,पर्पल कॕप,आरेज कॕप,यासह विविध बक्षिसे दिली जाणार आहेत.या स्पर्धेत आठ संघ सहभाग घेणार आहे.यास्पर्धेचे उदघाटन रविवारी सायंकाळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.यावेळी माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे,माजी प.स.सभापती करीमसाब गुळवे,माजी सभापती राधाकिशन तेलंग,नगरसेवक सय्यद इलियास,गणेश फुलारी,शिवदर्शन स्वामी,अनिल वाडकर,ज्ञानेश्वर चाकुरकर,साजीद शेख,आदि उपस्थित होते. चाकुर प्रिमीअम लिग स्पर्धा यशस्वी कारावी असे आहवान आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.यासाठी रणजी क्रिडा मंडळाचे अध्यक्ष जीत गायकवाड,कर्णधार बाळु कांबळे,अझहर दापकेवाले,परमेश्वर नवरखेले,विशाल मोठेराव,प्रकाश मानपाडे,ञिशांत शेवाळे,सुनिल सावळे,आकाश मोठेराव,असलम गुळवे,अमोल कसबे,प्रवीण कसबे,रज्जत भोळे,संजु महालिंगे हे पुढाकार घेत आहेत.

Post a Comment

0 Comments