बिलोली घटनेतील नराधमास फाशी द्या- लहुजी शक्ती सेनेची मागणी
निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मातंग समाजातील एका मुकबधीर मुलीवर बलात्कार करून दगडाने ठेचून ठार मारणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या अशी मागणी लहुजी शक्ती सेनेने निलंगा येथील उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. बिलोली येथील झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या मागासवर्गीय व निराधार मुलीला घरात एकटी असल्याचे पाहून त्याच्यावर बलात्कार करून दगडाने ठेचून ठार मारले. सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून संबंधित गुन्हेगाराला फाशीची शिक्षा करावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या निवेदनावर गोविंद सूर्यवंशी , संजय हलगरकर , अजय कांबळे ,सोमनाथ कदम ,गंगाताई कांबळे ,सत्याबाई शिंदे ,बबलू कांबळे ,बजरंग कांबळे निवेदनावर आदी जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments