रामलिंगेश्वर मंदिराच्या कलशारोहन कार्यक्रमाचा अतिशय भक्तीमय वातावरणात समारोप
कासार बालकुंदा: (प्रतिनिधी/मारुती लोहार) रामतीर्थ ता.निलंगा येथील ग्रामदैवत रामलिंगेश्वर मंदिराचे व हनुमान मंदिराचे कलशारोहन व विविध तीन दिवशीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात मंगळवारी (ता.२२)रोजी कलश मिरवणूक,पूजन व जलादीवास व रात्री ह.भ.प.अनंत महाराज चाडगावकर कीर्तन, बुधवार (ता.२३)रोजी सकाळी व्यासपीठ पूजन,धान्य आदिवास,हवन व रात्री ह.भ.प.मोहन हांडे महाराज यांचे कीर्तन, गुरुवार (ता.२४) रोजी सकाळी पूर्णाहुती, कलशारोहन व सकाळी होम हवन करून श्री रामलिंगेश्वर मंदिरावर व हनुमान मंदिराव कलशारोहन करण्यात आले.त्यांनतर भ.प.उद्धव महाराज कोळीवाडी यांचे काल्याचे कीर्तन झाले.महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या धार्मिक कार्यक्रमाला रामतीर्थ सह परिसरातील अनेक गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासाठी मंदिर समितीचे सयोंजक व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
0 Comments