राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे हरिहर भोसीकर यांचा जल्लोषात सत्कार; रऊफ जमींदार यांनी निवडीचे केले स्वागत
नांदेड:(प्रतिनिधी)दि. १७ - राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी हरिहरराव भोसीकर यांची नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह निर्माण झाला असून राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमींदार यांनी या निवडीचे स्वागत केले आहे. गुरुवारी सायंकाळी रऊफ जमींदार यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येत युवक कार्यकर्त्यांनी हरिहरराव भोसीकर यांची भेट घेऊन त्यांचा भव्य असा सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, मुखेड राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शिवाजी जाधव, रऊफ ज़मींदार यांच्या सह गगनदीपसिंघ रामगढ़िया, विक्रमसिंह ठाकुर, लखनसिंघ लांगरी, कर्मप्रीतसिंघ औलख, रितेश देशमुख, अमीर बिल्डर, अतीक बिल्डर, मुजीब भाई, कृष्णा पूयड, इमरान खान, खदिर भाई सह मोठ्या संख्येत कार्यकर्ता उपस्थित होते. यावेळी भोसीकर यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष बलकट करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. रऊफ जमींदार यांनी पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे कार्य सुरु असल्याचे सांगून अहोरात्र परिश्रम घेण्यात कुठली कसर राहणार नाही अशी भावना बोलून दाखवली.
0 Comments