औशात "रमाई"घरकुल योजना वर्षापासून खात्यावर नाही निधी,गरिबांचे घरकुल बांधावे कधी
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी जी शेख)औसा तालुक्यांमध्ये गेल्या एक वर्षापासून गरिबांचे असणारे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ची रमाई घरकुल आवास योजना या योजनेचा निधी गेल्या एक वर्षापासून उपलब्ध नाही यामुळे अनेक घरकुल बांधकाम सुरू असलेले बंद पडले आहेत. सध्या औसा तालुक्यामध्ये शासनाकडून गरिबासाठी मिळणारे "रमाई"घरकुल आवास योजना अंतर्गत घरकुल बांधकाम निधी एक वर्षभरापासून नसल्याने आणि तालुकाभर दरवर्षी आठशे ते हजार पर्यंत तालुक्यासाठी मंजुरी चे टारगेट दिली दिली टारगेट दिली दिली चे टारगेट दिली दिली टारगेट दिली दिली जाते याकरिता जवळपास एक कोटीपेक्षा जास्त निधी हवा असतो परंतु तो निधी उपलब्ध न झाल्याने गावोगावच्या नागरिकांची यादी तयार झाली असून ही यादी केवळ प्रतीक्षेत आहे. यामुळे अनेक नागरिक लाभार्थी उघड्यावर आपला संसार आणि कुटुंब दिवस काढत आहेत आणि घर बांधण्यासाठी घरकुल येणार आहे हीच अपेक्षा मनाशी बाळगून सध्या थंडी,ऊन,वारा,पाऊस,गारा यांचा सहन करत आहेत मारा,आणि संपूर्ण कुटुंबे उघड्यावर राहत असून ही योजना कधी सुरू होणार याकडे औसा तालुक्यातील लाभार्थी नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे परंतु शासनाकडून या योजनेचे निधी कधी उपलब्ध होईल हे सांगता येत नाही अशी आवस्था औसा तालुक्यात निर्माण झाली आहे.
【 】 सध्या केंद्र आणि राज्य सरकार हे अनु जातीसाठी,ओबीसी,एसटी,मुस्लिम साठी अनुकूल नसून हे सरकार विरोधी असल्याचे जाणवत असून गरिबांना मिळणारा निवारा याचाही निधी उपलब्ध करून देत नाही यामुळे हे सरकार जनसामान्य आणि शेतकरी विरोधीच असल्याचे दिसून येत आहे.
---लक्षमन कांबळे,भिम आर्मी लातूर जिल्हा महासचिव.
【 】औसा तालुक्यातील सर्व लाभार्थी औसा पंचायत समितीला गेल्या एक वर्षापासून यांना तुम्ही बांधकाम सुरू करा तुमचे बिल खात्यावर जमा होईल असा निरोप असल्याने यांनी बांधकामासाठी फुटींग खड्डे केले परंतु बिल आलेच नाही असे अरुण दादाराव गायकवाड,बालाजी त्र्यंबक शिंदे,सहदेव विश्वनाथ शिंदे,सर्व रा गुबाळ सह भादा येथील वाल्मीक माधव उबाळे सह तालुक्यातील अनेक गावातील नागरीक घरकुल लाभार्थी बिलासाठी चकरा मारींत आहेत यामुळे याबाबत औसा गट विकास अधिकारी यांनी वेळीवेळी शासनास कळवून या रमाई घरकुल योजनेचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली जात आहे.
--चांदभाई शेख,लातूर जिल्हाध्यक्ष,
ग्रामरोजगर सेवक संघटना.
0 Comments