प्रस्थापिता विरुद्ध नव्यांचा जोश ! पण मतदार घेणार कुणाची बाजु ठोस ?
कासार बालकुंदा:{ प्रतिनिधी/मारुती लोहार} येथे गेल्या काही दिवसा पासुन ग्राम पंचायतच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असुन प्रस्थापितांना सत्ता राखण्याची कसरत करावी लागणार आहे तर नव्या इनिंग ने सत्तेचे क्रिकेट खेळण्यासाठी अनेकांनी ग्रामपंचायतच्या या मैदानात उडी घेतली आहे . दोन्ही बाजुच्यांना हि खुर्ची आपलीच आहे असे जरी आज घडीला वाटत असले तरी उद्या मतदाराचा आशिर्वाद कोणाला मिळणार हे येणारा काळच ठरवेल. शिवाय या वेळेस अनेकजन सत्तेच्या या रेल्वेत बसण्यासाठी आत्ता पासुनच रुल पटडीहुन धावायचा प्रयत्नही करताना दिसत आहेत. या साठी काहीजन नेत्यांची मनधरणी करत आहेत तर काहीजन योग्य सदस्याची विनवणी करत आहेत. वाढत्या थंडीतही गावात ग्राम पंचायतच्या निवडणुकीने वातावरण गरम होत चालले असुन काहीजन आपलं कस्सं होईल म्हणुन ' मुझे निंद न आये चा सुर लावताना दिसत आहेत तर काहीजन मतदारांना आपल्याच पाठीमागे राहण्यासाठी तुझे मेरी कसम चा वादा करुन घेताना दिसत आहेत. त्यात विशेष म्हणजे अनेक जण नव्यानेच मै हु ना म्हणत आपल हि नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र मतदारांचा आशिर्वाद कोणाला मिळणार हे निकाला नंतरच कळेल तोपर्यंत तर सत्तेच्या बाबतीत ओ सामने है मगर आती नही सर्वासाठी असच वाटत.
0 Comments