ऑनलाईन कर्ज वितरण कंपन्यावर चाप लावा- डॉ.संतुजी लाड स्टुडंट असोसिएशन
लातूर:{प्रतिनिधी} कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, तसेच अडचणीत असलेल्या काहींना कर्ज देणारे अॅपच्या माध्यमातून केवळ आधारकार्ड व पॅनकार्डवर 90 ते 180 दिवसासाठी तब्बल पाच हजार ते एक लाखांपर्यंत कर्ज पुरवठा दिला जातोच त्यासाठी सुरुवातीला कर्जदारास विश्वासात घेतले जाते, कमी कागदपत्रे, जामीनदाराची गरज न घेता मोबाईल अॅपच्या सहाय्याने झटपट ऑनलाईन कर्ज दिले जाते. कर्ज मंजूर झाल्यावर त्यातून 35 ते 40 टक्के रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून कापली जाते एकदा का कर्जदाराने कर्ज स्विकारले की कंपन्याचा खेळ सुरु होतो, कर्जदाराला सात दिवसात भरण्यासाठी कंपनीद्वारे फोन केले जातात, कर्ज न भरल्यास रोजचे दीडशे ते दोनशे रु व्याज आकारले जाते, फोन कॉल करीत, मॅसेज पाठवून कर्जदारास अगदी हैराण केले जाते. कोर्टाची नोटीस देऊ, तुमचा सिबिल खराब करु किंवा धमक्या देत चक्क शिवराळ भाषा वापरली जाते. या विळख्यात कर्जदार पुरते अडकले आहेत एका कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या कंपनीचे अॅप काहीनी डाऊनलोड करुन कर्ज घेतले आणि या चक्रव्युहात फसत जात आहेत. कर्जाचा काही रक्कम फेडली, तरी पुढील वेळी भरलेली रक्कम वजा होत नसल्याचे आढळून येते कर्जदाराने मोबाईल बंद केला तरी कंपनीकडे कर्जदाराचा मोबाईलचा डाटा असतो त्या नातेवाईकाला फोन करून कर्जदाराची माहिती/ रक्कम सांगितली जाते सदर कर्ज फेडण्यासाठी तुमचा क्रमांक दिल्याचे सांगण्यात येते कर्जदारास नातेवाईक, मित्रमंडळींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक जण नैराश्यात गेले आहेत,मात्र तोंड दाबून बुक्क्याचा मारा सहन करत आहेत.तरी माननीय पंतप्रधान साहेबांनी ऑनलाइन कर्ज वितरित कंपन्यावर चाप लावावा व कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधानांकडे डॉ.संतुजी लाड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने देण्यात आले यावेळी अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड चे पदाधिकारी सुनिलभाऊ कांबळे,साईनाथ घोणे,महेश विजापुरे,बाळासाहेब विजापुरे, ह.भ.प.स्वप्नील महाराज घोणे, अजय घोणे, बालाजी विजापुरे, चैतन्य फिस्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments