Latest News

6/recent/ticker-posts

शिक्षक आमदार मा.विक्रमबप्पा काळे यांच्या चाकूर तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयांना भेटी

शिक्षक आमदार मा.विक्रमबप्पा काळे यांच्या चाकूर तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयांना भेटी

चाकूर: शिक्षक आमदार विक्रमबप्पा काळे यांनी आज ( दि.18/12/2020 रोजी)  त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतानादेखील चाकूर तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयांना भेटून शिक्षक,प्राध्यापक,मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा (शक्य होईल त्या) प्रयत्न केला. आमदार साहेबांनी तालुक्यातील जनता विद्यालय महाळंग्रा येथे त्यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या बोअरचे पाणीपूजन केले.तसेच शाळेच्या वतीने बप्पांच्या लग्न वाढदिवसानिमित्त केक कापला. विर भगतसिंग विद्यालय  आष्टा, लाल बहादूर  शास्त्री विद्यालय नळेगाव कारखाना, अनंत तुळजाराम विद्यालय, अल फारूख विद्यालय, शिवजाग्रती महाविद्यालय नळेगाव या ठिकाणी भेट देऊन शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेऊन शक्य असतील त्यांच्यावर  तेथेच तोडगा काढून त्यांची सोडवणूक केली. शासन निर्णय व शासनाच्या भूमिकेबद्दल शिक्षकांशी चर्चा केली. याप्रसंगी शिक्षकांनीही विविध विषयांवर बप्पांशी मनमोकळी चर्चा केली. शिवजाग्रती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय वाघमारे यांचे वडील व बंधू यांचे निधन झाल्याने त्यांचे सांत्वन केले. तसेच अल फारूख विद्यालयाचे मुख्याध्यापक वहाब जहागिरदार,कादीर जहागिरदार व मुख्याध्यापक दत्तात्रय पारवे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शिक्षक  संघाचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ,उपाध्यक्ष रामभाऊ व्यंजने,सचिव दयानंद कांबळे, तालुकाध्यक्ष प्रा.दयानंद झांबरे, माजी मंडळ सदस्य तानाजी पाटील,संघटनेचे गंगाधर आरडले, आलीम शेख,मुख्याध्यापक चेतन चव्हाण, प्रा.लंजीले इ.पदाधीकारी उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments