डॉ संतुजी लाड स्टुडंट असोसिएशनची महाराष्ट्रातील संपुर्ण कार्यकारिणी बरखास्त- साईनाथ घोणे
लातूर:(प्रतिनिधी) अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड प्रणित डॉ.संतुजी लाड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणीच्या सुचने प्रमाणे कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. संबंधित कार्यकारिणीतील सर्व पदाधिकार्यांनी आपल्या पदाचा यापुढे वापर करु नये अशा सूचना प्रदेश कार्यकारिणी कडून देण्यात आल्या आहेत. प्रदेश कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांच्या समन्वयातून लवकरच नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल असे प्रसिद्धिस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
0 Comments