Latest News

6/recent/ticker-posts

रोटरी क्लब ऑफ चाकुरच्या वतीने रक्तदान शिबिर

रोटरी क्लब ऑफ चाकुरच्या वतीने रक्तदान शिबिर

चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) कोरोनांच्या प्रादुर्भावमुळे आज लातुर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे रोटरी क्लब अॉफ चाकुरच्या वतीने चाकुर येथील सोसायटी चौकामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरांचे उदघाटन चाकुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक विठ्ठलराव माकणे,रोटरीचे अध्यक्ष विकास हाळे,प्रोजेक्ट मॕनेजर शिवदर्शन स्वामी,सचिव सुरज शेटे, डॉ.चंद्रप्रकाश नागीमे, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ.एन.जी.मिर्झा,शैलेश पाटील,चाकुर बिट अमंलदार हे.कॉ.रामचंद्र गुंडरे, पञकार प्रा. अ.ना.शिंदे, सुधाकर हेमनर,संगम जनगांवे,प्रशांत शेटे,नारायण बेजगमवार, रोटरीचे सदस्य उपस्थित होते.रोटरीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 41 रक्तदात्यांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यात आपले योगदान दिले.सर्व रक्तदात्यांचे आभार रोटरीचे अध्यक्ष विकास हाळे यांनी यावेळी मानले.

Post a Comment

0 Comments