आमचा इचार नाही ?
तर मग समजा ,
आत्ता वाजले कि बारा.....!
रुसलेल्या संभाव्य उमेदवाराची
पँनल प्रमनखाकडुन मनधरणी करण्याची अपेक्षा
पँनल प्रमुख जाताहेत परिस्थितीच्या आरी , बायकोपेक्षा ठरतेय मेव्हनी भारी !!
{बाबुराव आगलावे}
भादा:
सध्या काही ठिकाणी ग्राम पंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या वा-यात आपला ही सदस्यत्वाचा झेंडा एखाद्या पँनल मधुन लागेल का अशी चाचपणी काहीजण करताना दिसत आहेत. राजकिय व्यक्तीला खरतर एक इतरापेक्षा वेगळच वलय असतं . गावात आपण इतरा पेक्षा वेगळं दिसावं हि काहीजणाची अपेक्षा असते. त्यात राजकारणाचा तर नादच ' खुळा ' आणं त्यातल्या त्यात इम्प्रेशन तो बातच कुच और ! सध्या ग्रामपंचायत निवडणुक लागली असल्याने संभाव्य पँनल प्रमुख उमेदवाराच्या जुळवा जुळवीत मग्न आहेत तर त्या व्यस्त पँनल प्रमुखाचे लक्ष्य आपल्याकडे वेधण्यासाठी काही। संभाव्य उमेदवार अनेक शकली लढवताना दिसत आहेत. अनेकांना मात्तब्बर नेत्याच्या लोकप्रिय पँनल मध्ये आपला नंबर लागावा असे वाटत आहे मात्र स्पर्धेच्या या युगात ती जागा अगोदरच कुणीतरी पटकावल्याने। अशा संभाव्य उमेदवाराचा हिरमोड हि होताना दिसत आहे. मग आपली दाळ तिथं शिजणं शक्य नाही हे उमजल्या नंतर काही रुसलेले संभाव्य उमेदवार त्या पँनल प्रमुखाचे लक्ष्य आपल्याकडे वेधण्यासाठी अनेक शकली लढवताना दिसत आहेत. त्यात त्यांना कुणापाशी तरी सांगावा धाडणे , तरीही लक्षं नाही दिलं तर त्यांच्या विरोधी पार्टीत जावुन बसणे , तेवढ्यावर नाहीच भागले तर स्वत:च अनेक मतदाराच्या भेटी घेणे व जमलच तर थेट त्या पँनल प्रमुखांच्या कार्यकर्त्या जवळ जावुन निरोप देणे कि , साहेबाला सांगा आवंदाच्या निवडणुकीत माझा इच्यार करा म्हणावं नाहीतर तुमच्या विरोधी पार्टीला मी मदत करीनं आणं मग समजा माझा इचार नाही झाला तर समजा तुमचे आता वाजले कि बारा....
सध्या गाव पातळीवर आपल्याला ग्राम पंचायत मध्ये कस्स्ं जाता येईल यासाठी काहीजण अनेक फंडे वापरताना जरी दिसत असले तरी कोणाचे स्टार चमकतात हे भविष्यातच कळेल . पण सध्या तरी काही पँनल प्रमुखांना अशी माणसं डोके दुखी ठरताना दिसत आहेत. एकीकडे काबील उमेदवार शोधताना करावी लागणारी तारेवरची कसरत आणं त्यातच अशी नमुनेबाज माणसं सांभाळताना त्या पँनल प्रमुखांना बायको पेक्षा मेव्हनीच भारी चा प्रत्यय येत असेल. ते काहीही असले तरी ग्रामपंचायत साठी अनेकजण सदस्यत्वाचे दिवसाही स्वप्न बघत फिरताना दिसत आहेत . पण मतदारांचा आशिर्वाद कोणाचा मिळतो तोच शेवटी सुपर हिरो ठरणार आहे.
तोपर्यंत हौश्या गौश्याची वरात पँनल प्रमुखांच्या दारात गोंधळ घालत आहे एवढं मात्र खरं.
0 Comments