भादेकरांनो खुशखबर !!
गावचा मुख्य चौक बदलतोय आपले रुप !!
{बाबुराव आगलावे}भादा :लातुर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार धिरज देशमुख यांच्या मुलभुत निधीतुन व बालाजी शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातुन गावचा मुख्य चौक आता नव्या रुपात भादेकरांना थोड्याच दिवसात पाहण्यास मिळणार आहे. या संबंधीत काम सध्या वेगात चालु आहे. गावचा आठवडी भाजीपाला बाजार या भागात भरणार असुन यामुळे गावच्या अर्थकारणाला विशेष गती मिळणार आहे. भाद्याच्या इतिहासात आठवडी भाजीपाला बाजार हा बालाजी शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातुन भरवला जात असुन या साठी आता गावच्या मुख्य चौका पासुन वरवडा रस्त्याच्या भागात हा बाजार भरविण्याचे नियोजन असुन हे काम वेगात चालु आहे . थोड्याच दिवसात भादेकरांना गावचा मुख्य चौक एका नव्या आणी बदललेल्या स्वरुपात पहायला मिळणार आहे. या भागात आढवडा भाजीपाला बाजार भरल्यानंतर नव्या स्वरुपातील हे बदलते स्वरुप पाहण्याची आतुरता भादेकरांना लागली आहे.
आढवडी भाजीपाला बाजार भरवल्यामुळे गावच्या अर्थ कारणाला गती मिळणार असुन यामुळे गावातील शेतक-यांनाही याचा लाभ नक्कीच होणार असुन गावात भाजीपाल्याचे क्षेत्रही वाढण्यास मदत होणार आहे. गावात सर्व सोयीनियनक्त आधुनिक पद्धतीने व्यापा-यांना व ग्राहकांना सोयीचा होईल असा आठवडी बाजार भरवण्याचा आमचा प्रयत्न असुन। गावच्या या विकास कामात लातुर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार धिरजजी देशमुख यांचे आम्हाला खुप मोठे सहकार्य मिळाले आहे- बालाजी शिंदे भादा
0 Comments