अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र घोषित करण्याची एम आय एमचे इनामदार यांची मागणी
औसा:( तालुका प्रतिनिधी) दि.१८ - औसा शहर हे ऐतिहासिक शहर असून औसा नगर परिषद हतद्दीतील लोकसंख्या जवळपास ४० हजाराच्या आसपास झाली आहे.यामध्ये मुस्लिम, बौद्ध,जैन समाजासह इतर अनेक अल्पसंख्यांक समाजांची लोकसंख्या असून औसा शहर हे ' अल्पसंख्यांक बहुल शहर क्षेत्र ' म्हणून घोषित करण्यात यावे या मागणीचे निवेदन औसा एमआयएम प्रमुख सय्यद मुजफ्फरअली नामदार यांच्यावतीने नगराध्यक्ष व मुख्याधिकारी नगर परिषद औसा यांना निवेदन सादर केले आहे. तसेच "१८ डिसेंबर हा, अल्पसंख्यांक हक्क दिन " साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन दिले आहे. याविषयी की, शहरात अल्पसंख्यांक समाजाची ४५ % टक्के च्या पुढे वाढत असून अल्पसंख्यांक समाजासाठी शासन स्तरावर विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात पण औसा शहर हे अल्पसंख्यांक बाहुल क्षेत्र म्हणून घोषित झाला नाही, व त्या योजनांचा लाभ जनतेला मिळत नसल्याने औसा एमआयएमच्या वतीने वारंवार सन २०१२पासून निवेदने देण्यात आली, पण अद्याप कसल्याही प्रकारचा निर्णय घेतला गेला नाही. याबाबत औसा नगर पालिकेने सर्वसाधारण सभेत अल्पसंख्यांक बहुल शहर क्षेत्र म्हणून ठराव मंजूर करावा. ऐतिहासिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे आहे. दि. १८ डिसेंबर २०२० रोजी " आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र म्हणून औसा शहर घोषित करा अशी मागणी एमआयएम प्रमुख औसा यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
0 Comments