गुरु तेगबहादुर यांचा चतुर्थ शताब्दी प्रकाशपर्व शासनस्तरावर साजरा व्हावे- रविंदरसिंघ मोदी यांची मागणी
नांदेड:{प्रतिनिधी} दि. 18 - शीख पंथाचे नऊवें गुरु श्री तेगबहादुरजी यांचा चतुर्थ शताब्दी वर्ष येत्या एप्रिल - 2021 महिन्यात जगभर साजरा करण्यात येणार असून केंद्र शासना प्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील शासनस्तरावर 400 वीं जयंती पर्व साजरा व्हावा अशी मागणी रविंदरसिंघ मोदी (पत्रकार) यांनी निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक निर्माण मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नावे पाठविण्यात आलेल्या निवेदनात मोदी यांनी पुढे नमूद केले आहे की, गुरु तेगबहादुर जी यांचा चतुर्थ शताब्दी प्रकाशपर्व केंद्र शासनातर्फे आणि पंजाब शासनातर्फे शासकीय सोहळा अंतर्गत साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध समितियांचे गठन सुरु आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येत शीख समाज वास्तव्यास आहे. तसेच नांदेड येथे गुरु गोबिंदसिंघजी यांचे शेवटचे स्थान आहे. या ठिकाणी श्री गुरु ग्रंथसाहेबांना गुरुगादी प्रदान करण्यात आलेली आहे. गुरु तेगबहादुर हे गुरु गोबिंदसिंघजी यांचे वडील होते. नांदेड येथे भव्य गुरुद्वारा विद्यमान असून या धार्मिकस्थळास तखतचा दर्जा प्राप्त आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने शासकीय सोहळा म्हणून चार शे वां प्रकाशपर्व साजरा करावा अशी शीख समाजाची भावना आहे. वरील पत्राची प्रत जिल्हाधिकारी साहेब नांदेड़ आणि गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष यांना पाठविण्यात आली आहे. दि. 19-12-20 रोजी "हिन्द की चादर, गुरु तेगबहादुर" यांचा 345 वां शहीदी दिवस असल्याचे औचित्य साधून वरील मागणी महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली आहे. यासाठी सर्वधर्मीय समिति शासनाने गठित करावी अशी मागणीही या निवेदनाच्या मध्यमाने रविंदरसिंघ मोदी यांनी येथे केली आहे.
0 Comments