संभाजी ब्रिगेडच्या निलंगा तालुकाध्यक्षपदी प्रमोद कदम यांची निवड
निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) शिव शाहू फुले आंबेडकर यांचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी धडपड करून सामाजिक वाटचाल करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कदम यांची मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडच्या निलंगा तालुकाध्यक्ष पदी निवड झाली आहे. ही निवड संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रामहरी भिसे यांनी केली. या निवडीसाठी प्रमुख उपस्थिती संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्यकारणी सदस्य उमकांतजी उफाडे होते तसेच हनुमंत गायकवाड,इर्शाद शेख, गोविंद काळे , अल्ताफ सय्यद आदी जणांची उपस्थिती होती. या निवडीबद्दल डॉ शिंदे.एस.एस निलंगा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष,अँड.तिरुपती शिंदे ,डॉ.हंसराज भोसले मराठा सेवा संघ अध्यक्ष, व्यापारी मंडळी, शिक्षक ,प्राध्यापक वर्ग, सामाजिक, राजकीय मंडळी , सर्व पत्रकार बांधव यांच्या कडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
0 Comments