Latest News

6/recent/ticker-posts

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या;पाच मुलं झाली अनाथ

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या;पाच मुलं झाली अनाथ


लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.१७ - लातूर .पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा खून करुन स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना औसा तालुक्यातील आशिव येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. अनुराधा महादेव पारधे (४०) व महादेव पारधे (४५, रा. आशिव) असे मयत पत्नी व पतीचे नाव आहे. भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी सांगितले, आशिव येथील धर्मा कांबळे यांची मुलगी अनुराधा हिचा विवाह २० वर्षांपूर्वी तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील महादेव पारधे यांच्याशी झाला होता. मात्र, दोन वर्षांपासून पती- पत्नीमध्ये सतत वाद होऊन भांडणे होत होती त्यामुळे पत्नी अनुराधा ही आपल्या मुलांसह माहेरी येऊन राहू लागली. तसेच त्यांचा पतीही आशिव येथे राहण्यासाठी आला होता. तो दररोज तुळजापूर येथे कामासाठी जात होता. बुधवारी रात्री पती- पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. तेव्हा राग अनावर झाल्याने पती महादेव पारधे याने चाकूच्या सहाय्याने पत्नी अनुराधा यांचा गळा चिरला.यामध्ये त्या जागीच मृत्यूमुखी पडल्या. दरम्यान, आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याने महादेव यानेही राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी मयत महादेव याचा लहान मुलगा अर्णव याने आई- वडिलांचे मृतदेह पाहून आजोबांना माहिती दिली. दरम्यान, त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली असता अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, भादा ठाण्याचे सपोनि संदीप भारती, पोउपनि महेश मुळीक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५ मुलं झाली अनाथ...

मयत अनुराधा व महादेव पारधे यांना तीन मुली, दोन मुले आहेत.आई- वडील मयत झाल्याने ही लेकरं आता पूर्णपणे अनाथ झाली आहेत.

Post a Comment

0 Comments