ऐकावं ते नवलच'चक्क गाढवाला निवेदन
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी जी शेख)दि.१९ - लातूर शहरातील व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासा बद्दल सर्व राजकीय व प्रशासकीय लोक डोळेझाक करतात त्यांच्या डोळे उघडण्यासाठी आज माननीय गाढव साहेब यांना अल्पसंख्याक समाजाचे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र जन एकता संघटनेच्या वतीने माननीय गाढव साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले की सर्व राजकीय लोक व लातूर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा अल्पसंख्यांकाचे कोणतेही विकास कामे होत नाही.लातूर प्रशासनाला अल्पसंख्यांकांचे विविध प्रश्नासंदर्भात वारंवार निवेदन देऊन सुद्धा विकास कामाबद्दल डोळेझाक करतात म्हणून आज अल्पसंख्याक दिवसाचे औचित्य साधून आज महाराष्ट्र जन एकता संघटनेच्यावतीने माननीय गाढव साहेब यांना निवेदन देउन विनंती करण्यात आली की आपणच शासन-प्रशासन आला बुद्धी द्यावे असे विनंती गाढव साहेब यांना करण्यात आली तसेच अल्पसंख्यांक वस्तीग्रह काम व अल्पसंख्याक वस्तीचे विकास व लोकांचे का होत नाही, लातुरातील कित्येक कब्रस्थान यांचे भिंत पडलेले आहेत गाव भागातील सूरतशहावली दर्गा समोरील सभागृहाचे बांधकाम बंद पडले आहे तसेच शहरातील अनेक समस्या वरती निवेदन देऊन सुद्धा शासन-प्रशासन जागा होत नसल्यामुळे आज आम्ही गाढव साहेब यांना निवेदन देऊन विनंती केली की लवकरात लवकर अल्पसंख्यांक कामे मार्गी लावावे हे विनंती केली.
0 Comments