मुस्लिम आरक्षण शिक्षण संरक्षण मागणीसाठी काली पट्टी लावून आंदोलन आणि शेतकरी विध्येकाचा निषेध करून समर्थन
लातूर:{प्रतिनिधी} मुस्लिम आरक्षणा वर राज्य भरात मोठी आंदोलन झाली परंतु मागील सरकार असो की विद्यमान सरकार मुस्लिम आरक्षण शिक्षण संरक्षण या विषयावर त्यांनी मौन बाळगलेले आहे. काही मुस्लिमांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही ,राज्यात सत्ता परिवर्तन झाल्या नंतर मुस्लिम समाजाला अपेक्षा होती की ते या विषयावर बोलतील परन्तु असं दिसून येत नाही म्हणून आज राज्य भरात मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने काळी पट्टी बाधूंन राज्यशासनाचा निषेध करण्यात आला ,आज तसेच लातूर शहरामध्ये काळ्या फीति लावून निषेध व्यक्त करण्यात आला.केंद्र शासनाने शेतकारी विरोधी कायदा केल्याने देशात आंदोलन मोठ्या स्वरुपात चालले आहे. त्याला समर्थन ही काळी पट्टी बाँधून देण्यात आले, यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे राज्य सरचिटणीस मोहसिन खान,एन ए इनामदार, शादुल शेख, फिरोज शेख, अहद पठान आदि उपस्थित होते.
0 Comments