Latest News

6/recent/ticker-posts

खरोसा ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याठी आमदार अभिमन्यु पवार यांची बैठक

खरोसा ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याठी आमदार अभिमन्यु पवार यांची बैठक

खरोसा:(प्रतिनिधी/श्रीकांत ङोके) ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदानाच्या तारखा निश्‍चित झाल्‍यानंतर उमेदवार निश्‍चित करण्याचे काम देखील सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये बडे नेते देखील लक्ष घालत असून, ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्‍न असतो. त्‍याच अनुषंगाने निवडणुक बिनविरोध करण्यासाठी औसा तालुक्याचे विद्यमान  आमदार अभिमन्यु पवार यांनी खरोसा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर 21 लाख  रुपयांचा निधी आज झालेल्या बैठकीत जाहिर केला आहे. आ.पवार हे औसा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आहेत. संबध देशावर करोना चे संकट व निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात होणारा खर्च बचत व्हावा व गावातील एकोपा कायम टिकुन राहवा म्हणुन हा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन आमदार पवार यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments