Latest News

6/recent/ticker-posts

चाकूर तालुक्यात तेरा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती; २४ गावच्या निवडणुकीवर असणार नियंत्रण

चाकूर तालुक्यात तेरा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती; २४ गावच्या निवडणुकीवर असणार नियंत्रण 

चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} तालूक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी  १३ निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी दिली आहे.  तालूक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुक होत असून यातील ८१ प्रभागातून २१६ सदस्य निवडणुक द्यावयाचे आहेत. यात अनुसुचित जाती प्रवर्गासाठी ४०, अनुसुचित जमाती ४, नागरिकांच्या मागास प्रवर्ग ५७ व खुल्या प्रवर्गासाठी ११५ जागा आहेत. या निवडणुकीसाठी गाव निहाय निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात नळेगाव - शाखा अभियंता शरद निकम, दापक्याळ व रोहिणा - विस्तार अधिकारी एस. जी. पुट्टेवाड, नागेशवाडी व उजळंब - उपअभियंता के. आर. नाबदे, महाळंगी व शिवणखेड - विस्तार अधिकारी एम. व्ही. माने, शेळगाव व कबनसांगवी - कृषी पर्यवेक्षक व्ही. एम. चव्हाण, अजनसोंडा व ब्रम्हवाडी - कृषी अधिकारी एस. जी. गायकवाड, वडवळ नागनाथ - विस्तार अधिकारी एकनाथ बुआ, हाडोळी व केंद्रेवाडी - शाखा अभियंता एस. जी. पवळे, महाळंग्रा व बोरगाव - विस्तार अधिकारी एस. व्ही. बोरगावकर, लिंबाळवाडी व कडमुळी - शाखा अभियंता एन. एन. फड, झरी (खु) व राचन्नावाडी - मंडळ कृषी अधिकारी एन. आर. शिंदे, जगळपुर व बावलगाव - शाखा अभियंता व्ही. एन. सुर्यकर, महाळंग्रावाडी व टाकळगाव - शाखा अभियंता बी. डी. कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आचारसंहीता विभागाचे प्रमुख म्हणून गटविकास अधिकारी काम पाहणार असून तसेच प्रत्येक गावात ग्रामसेवकाला याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, क्षेत्रीय अधिकारी यांच्या बैठका घेऊन निवडणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे तहसीलदार डाॅ.शिवानंद बिडवे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments