Latest News

6/recent/ticker-posts

सोयाबीन मारले तर तुरीने झोडपले

 सोयाबीन मारले तर तुरीने झोडपले

कासार बालकुंदा:(प्रतिनिधी/मारुती लोहार) निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कासार बालकुंदा तांबाळा ,तांबाळावाडी ,सरदारवाडी , देवी हल्लाळी, मिरगाळी, ममदापूर, चिलवंत वाडी नेलवाड बडूर मालेगाव कलमुगळी वाक्सा या गावातील शेतकऱ्यांच्या तुरी पाच-सात दिवस ढगाळ वातावरण असल्याने तुरीला लागलेल्या फुले व शेंगा पूर्णता गळून जमिनीवरती पडले आहेत. कर्नाटक भागातील जमीन लाल मातीचे असल्याने येथील शेतकरी तूर या पिकावर ती जास्त प्रमाणात अवलंबून असतो. त्याच्या जीवनाची शिदोरी हिसकावून घेतल्यासारखे झाले आहे. शेतकरी सोयाबीन चांगले आले म्हणून खुशीत होता परंतु परतीच्या पावसाने चांगले आलेले सोयाबीन पाण्यात गेले खचून न जाता तुरीची उत्पादन चांगले होईल ही अपेक्षा शेतकरी वर्गाला होती परंतु सोयाबीन ने दगा दिला त्यापेक्षा जास्त तुरीने शेतकऱ्यांना  दगा दिला आहे. हेक्टरी तुरीपासून शेतकऱ्यांना दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न प्रतीवर्षी मिळत असते परंतु याही वर्षी शेतकऱ्यांची आशा होती चांगल्या प्रकारे तुरीचे उत्पादन होईल. पाच-सहा दिवस वातावरण खराब असल्याने तुरीचे फुल तर गळालेच पण शेंगा  गळल्याने शेतामध्ये तुरीचे खराटा उभा राहिला आहे. शेतकरी खते बी-बियाणे कोळपणी खुरपणी मेहनत असा मोठा खर्च केले आहेत परंतु हाती मात्र काहीच राहत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. सोयाबीन व तुर पिकावरती खरिपाचा पिक विमा करण्यात आला आहे परंतु अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना कसलाही विमा प्राप्त झाला नाही. शासनाने शेतकऱ्यांची अवस्था पाहून तातडीने मदत करावी व लवकरात लवकर विमा शेतकऱ्यांना मिळेल त्याची दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

 माझ्या शेतातील जवळ जवळ 80 टक्के तुरीचे खराटे झाले आहेत. ढगाळ वातावरण असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने मदत करावी- बसवराज पाटील उपसरपंच तांबाळा

Post a Comment

0 Comments