गाव पुढाऱ्याचे पॅनल तयारीसाठी धावपळ सुरू;ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले
कासार बालकुंदा:{ प्रतिनिधी/मारुती लोहार} निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील सर्वात मोठी ग्रामपंचायत कासार बालकुंदा ही असून गावातील पुढाऱ्यांच्या नजरा उमेदवाराकडे लागले आहेत. उमेदवार मिळविण्याचे तयारीदेखील पुढारी दिसत आहेत. पॅनल साठी जुळवाजुळव व नागरिकांना रामराम ,जवळ घेऊन बोलणे हे दिसत आहे. कासार बालकुंदा ग्रामपंचायत मोठी ग्रामपंचायत आतून प्रत्येक वेळेस चुरशीची लढाई होते. कासार बालकुंदा ग्रामपंचायत चाळीस वर्ष यांच्या ताब्यात आहे व जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती हाल्लापा कोकणे एकीकडे तर दुसरीकडे आठ महिन्यापूर्वीच जिल्हा परिषद अध्यक्ष असणारे मिलिंद लातूरे व आमदार अभिमन्यू पवार यांचे समर्थक नितीन पाटील यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. थंडीत राजकीय वातावरण तापत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सरपंच पदाचे आरक्षण open महीला असल्याने सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ग्रामपंचायत सदस्यांची मुदत संपुष्टात आली आरक्षण कोणत्या प्रवर्गात होतील याची चौका-चौकात गणिते मांडली जात आहेत. आतापासूनच भविष्यातील ग्रामपंचायत तालीम सुरू झाली आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे गाव कारभार प्रशासक व ग्रामसेवक हाकत आहेत. बहुतांश गावात पंधराव्या वित्त आयोगाचे खाते प्रमाणित झाली नसल्याने आर्थिक उलाढालीस बंधन आले आहे. कासार बालकुंदा ग्रामपंचायतीला यापूर्वी 4 वार्ड होते मात्र या वर्षी पाच वार्ड रचना करण्यात आली आहे. येथील निवडणूक प्रतिष्ठा पणाला लावणारे होते. काही उमेदवार कोणत्याही पक्षाला नाराजी नको म्हणून राजकारणाच्या बाहेर फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र पक्षांतर्गत गटबाजी होऊन त्याचा परिणाम ग्रामपंचायती होणार का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. फॉर्म भरण्याची तारीख व मतदानाची तारीख आत्ताच जाहीर झाल्याने व्हाट्सअप ग्रुप वरती देखील चर्चेला उधाण आले आहे. एवढे मात्र नक्की निवडणुकीची चाहूल लागताच गणितीय समीकरणे जुळवताना पुढारी दिसता आहेत.
0 Comments