अविनाश दादा रेशमे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा
निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) तालुक्यातील औराद येथे अविनाश दादा रेशमे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन अविनाश दादा रेशमे व औराद पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रदिप गौड, अमोल ढोरसिंगे, आण्णासाहेब मिरगाळे, प्रशांत वाजरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक अविनाश दादा रेशमे यांच्या वतिने 21001 रु. दिव्तीय पारितोषिक औराद पोलिस स्टेशनच्या वतिने 11001रु व तृतीय पारितोषिक दै.सामनाचे पत्रकार अमोल ढोरसिंगे यांच्या वतीने 7001रु जाहीर केले आहे. या स्पर्धेचे नियोजन विवेक अंतरेड्डी,आकाश अंतरेड्डी, आंबादास अंतरेड्डी,लखन बोंडगे, रंगराव म्हेत्रे,बलाजी हासूरे ई शिवसैनिकांनी केले आहे.
0 Comments