Latest News

6/recent/ticker-posts

शासकीय हॉस्टेल लवकर सुरु करावे वंचित बहुजन विद्यार्थी आघाडीची निवेदन देऊन केली मागणी

शासकीय हॉस्टेल लवकर सुरु करावे वंचित बहुजन विद्यार्थी आघाडीची निवेदन देऊन केली मागणी 

चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} कोरोना च्या या पार्श्वभूमीवर चालू करण्यात आलेल्या शाळा व कॉलेज मधील शिक्षण घेणारे विद्यार्थी बहुतांशी हॉस्टेल व वस्तीगृहामध्ये राहतात.बहुतांशी विद्यार्थीना बाहेर गावातुन येणे अशक्य आहे.  परंतु हॉस्टेल व शासकिय वसतिग्रहे चालु झालेले नाहीत. यामुळे अनेक विध्यार्थाची हेळसांड होत आहे. म्हणुन लवकरात लवकर वसतिग्रह व हॉस्टेल चालु व्हावे यासाठी चाकुर तहसिल कार्यालय येथे वंचित बहुजन विध्यार्थी आघाडी च्या वतिने निवेदन देण्यात आले यावेळी , वर्धमान कांबळे, विध्यार्थी तालुका अध्यक्ष सिंध्दार्थ गायकवाड, शहर अध्यक्ष महेश बिरादार, सचिव सागर जाधव, दाऊत सौदागर ,प्रफुल नाईकवाडे, मधुरेश गुंजरगे, अनिकेत इंद्राळे,  संघम कलवले, संदेश पाटोळे, प्रणव नाईकवाडे, अरुण कांबळे, विशाल वाघमारे, केदार लोंढे,  व सर्व विध्यार्थी आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments