Latest News

6/recent/ticker-posts

अॅड.मजहर शेख यांचे पुन्हा शिवसेनेत प्रवेश

 अॅड.मजहर शेख यांचे पुन्हा शिवसेनेत प्रवेश

औसा:(शहर प्रतिनिधी) दि.७ - औसा शहरातील अॅड मजहर शेख यांचा पुन्हा शिवसेना पक्षात प्रवेश झाला. कट्टर मुस्लिम शिव सैनिक म्हणून सदा चर्चित असलेले  औसा शहरातील अँड मजहर शेख यांचा पुन्हा शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे ,विधानसभा निवडणुकी मध्ये औसा विधानसभेला शिवसेनेला जागा न दिल्याने नाराज होऊन त्यानी कांग्रेस पक्षाचा प्रचार केला होता. व तसेच भूमिपुत्रा साठी त्यानी आंदोलन केले होते. तसेच त्यांच्या विरुद्ध गुन्हा  नोंद झाला  होता. पण काल अचानक ते खा.ओमराजे यांच्या उपस्थितीत व जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वा खाली शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांची सामाजिक क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय असल्यामुळे त्यांच्या या पक्षप्रवेशा कडे दिग्गजांचे लक्ष लागून होते. गोरगरिबांची न्यायालयातील कामे ते अगदी कमी दरामध्ये करून देत असल्याने त्यांचा वेगळा ठसा समाजामध्ये आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये त्यांनी बऱ्याच कुटुंबांना शिधा वाटप करून समाजासाठी महत्त्वपूर्ण कामे केल्यामुळे त्यांचे नाव लौकिक झाले होते. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे बऱ्याच जणांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments