महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या चाकुर तालुका प्रतिनिधी पदी प्रा.वैजनाथ सुरनर यांची नियुक्ती
चाकूर:(प्रतिनिधि)आदर्श गाव अलगरवाडी येथील रहिवासी तथा सिद्धेश्वर कनिष्ठ महाविद्यालय झरी बु येथे गेल्या २६ वर्षापासून कार्यरत असलेले मराठी भाषा विषयाचे अभ्यासक ,प्रा. वैजनाथ संभाजी सुरनर यांची "महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या" चाकुर तालुका प्रतिनिधी म्हणून जिल्हा प्रतिनिधी प्रा.तुकाराम जोहारे यांनी नियुक्ती केली आहे. प्रा.सुरनर हे फुले,शाहू, आंबेडकर व अण्णा भाऊ यांच्या साहित्याचे वैचारिक अभ्यासक व व्यासंगी वक्ते आहेत. ते सध्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनाच्या कमिटीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. एक अभ्यासू, चारित्र्यवान आणि महापुरुषांच्या परिवर्तनवादी चळवळीचा भाष्यकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अनेक वेगवेगळ्या विचार पीठावरून महापुरुषांच्या चरित्रांचा आदर्श त्यांनी समाजासमोर आपल्या भाषणाच्या माध्यमातून मांडला आहे. विद्यार्थ्यांच्या तळमळीचा हाडाचा शिक्षक म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. त्यांना शासनाचा 'नेहरू युवा पुरस्कार', आदर्श शिक्षक पुरस्कार,व सामाजिक कार्याचा "होलार समाज भूषण पुरस्कार" मिळाला आहे. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ सर,जुक्टाचे जिल्हा सचिव प्रा.बाळासाहेब बचाटे, प्राचार्या श्रीमती रसिकाताई देशपांडे मॅडम, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे ता.अध्यक्ष प्रा. दयानंद झांबरे,मुख्याध्यापक वहाब जागीरदार,प्रा ज्ञानेश्वर चामे, पत्रकार मधुकर कांबळे सर, प्रा.बुद्रुक पाटील, प्रा.नारायण खेडकर,प्रा सिद्धेश्वर निजवंते, प्रा .डी. एन.हेमनर प्रा. रमेश तेलंग प्रा.होनाळेसर, यांच्यासह सर्व सहकारी व आजी-माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी आणि वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments