Latest News

6/recent/ticker-posts

गंजगोलाई(बाजारपेठ) लावलेली लोखंडी पाईप काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिले जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

गंजगोलाई(बाजारपेठ) लावलेली लोखंडी पाईप काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिले जिल्हाधिकार्‍यांना निवेदन 


लातूर:(प्रतिनिधी) शहरातील गंजगोलाई भागात असलेल्या बाजारपेठेत लावण्यात आलेली लोखंडी पाईप काढण्यात यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांना मनसे शहर सचिव सय्यद सरफराज यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाचे शहर अध्यक्ष मनोज अभंगे,विद्यार्थी सेना उपाध्यक्ष अजय कलशेट्टी,शहर सचिव बजरंग ठाकूर,मुख्तार शेख,दत्ता सूर्यवंशी,व्यापारी बांधव इम्रान नदाफ,शेख तोसिफ, बालाजी पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments