Latest News

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज चौकाने घेतला मोकळा श्वास;जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचे कंपाऊंड पाडण्यास झाली सुरुवात

छत्रपती शिवाजी महाराज चौकाने घेतला मोकळा श्वास;जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचे कंपाऊंड पाडण्यास झाली सुरुवात 

लातूर:(प्रतिनिधी बी जी शेख) येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले जुने कंपाऊंड पाडून व पाठीमागे सरकवले जात आहे त्या ठिकाणी नवीन कंपाऊंड बांधले असून जुने कंपाउंड ची भिंत पूर्णपणे पाडलेली आहे त्यामुळे आता लातुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातला हा रस्ता आणखीनच मोठा होणार असल्याने नागरिकांना याचा चांगलाच फायदा होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूचे कंपाऊंड काढून हा रस्ता जसा मोठा झाला तसाच दुसर्‍या बाजूने जे झालेले अतिक्रमण काढून सदरील रस्ता रुंदीकरण होणार का ? असा प्रश्न लातुरातील नागरिक विचारत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या स्वभोवतालचा हा परिसर सुशोभित करून या रस्त्याचे रुंदीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे दरम्यान शिवाजी चौकातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे कंपाऊंड पाडल्यामुळे या ठिकाणचा रस्ता आता मोठा होणार असून वाहनांची होणारी गर्दी या ठिकाणी कमी होणार आहे त्यामुळे लातूरकरांना या रस्त्यामुळे मोठा फायदा होणार आहे.

Post a Comment

0 Comments