Latest News

6/recent/ticker-posts

धानोरा शिवारात नौजर ची चोरी

 धानोरा शिवारात नौजर ची चोरी 

निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील धानोरा गावातील शेतकरी रशिद शिलारसाब शेख हे हरभरा पिकाला स्पिंकलर च्या सहाय्याने मागील 8 - 10 दिवसापासून पाणी देत होते शेख यांच्या शेतातील काल रात्री नौजरची चोरी झाली आहे. मागील काळात सुद्धा शेख यांच्या शेतातील विहिरीतील पाणबुडी दोन वेळा चोरी झाली होती काल पाच वाजेच्या दरम्यान शेख हे पाईप बदलून सहा वाजता घराकडे गेले होते रात्रची वीज असल्यामुळे ते जेवण करून रात्री इस्टाटर चालू केले असता त्याच्या लक्षात आले की आपले नौजरची चोरी झाली किंव्हा कुठे पाईप निघाला का अशी शंका त्यांना आली व त्यानंतर त्यांनी सकाळी शेजाऱ्या शेतकऱ्यांशी विचारणा केली असता त्याने आम्हाला काही माहीत नाही असे सांगितले.

अश्या चोरीला आळा बसला पाहिजे अशी मागणी शेतकरी शेख व शेतकरी वर्गातून होत आहे.

Post a Comment

0 Comments