Latest News

6/recent/ticker-posts

चापोलीजवळ तृतीयपंथीयाची हत्या संशयीत आरोपी पोलीसांच्या ताब्यात

चापोलीजवळ तृतीयपंथीयाची हत्या संशयीत आरोपी पोलीसांच्या ताब्यात 

चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} लातुर-नांदेड रस्त्यावरील ब्रम्हवाडीपाटी जवळ अनैतिक संबंधातुन  एका तृतीयपंथीयाचा खुन करण्यात आल्याची घटना चार दिवसापुर्वी घडली असुन यातील संशियत आरोपीला शनिवारी पोलीसांनी अटक केली आहे. हदगाव तालुक्यातील चक्री या गावातील एक तृतीयपंथी लातुर येथे राहत होता.त्याची सुनिल मोतीराम राठोड रा.बोकनगांवतांडा यांच्याशी ओळख झाली.त्या तृतीयपंथीयासोबत तो अनैतिक संबंध ठेवत होता.मंगळवारी दि.८ रोजी हे दोघे चापोली येथुन लातुरकडे निघाले असता ब्रम्हवाडी पाटीजवळ त्याच्या त भांडण झाले.सुनिल याने त्याच्या डोक्यावर काठीने मारहाण केली यात तो तृतीयपंथी बेशुद्ध पडला होता.त्याला चाकुर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन चाकुर पोलीस स्टशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पो.हे.ईश्वर स्वामी यांनी तपास करुन सुनिल राठोड यास लातुर येथुन अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments