भादा येथे पहिल्या बायोगॅस सयंत्राचे कृषी विस्तार अधिकारीच्या हस्ते भूमिपूजन
औसा:(तालुका प्रतिनिधी) दि.१० - तालुक्यातील भादा येथे गुरुवार दिनांक 10 डिसेंबर डिसेंबर 2020 रोजी बायोगॅस सयंत्र यासाठी कृषी विस्तार अधिकारी जयराम भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. औसा तालुक्यातील भादा येथे बायोगॅस सयंत्र कृषी खात्याकडून देण्यात येणार आहे यासाठी याचे भादा येथील पहिले बायोगॅस सयंत्राचे पहिले मानकरी राजकुमार धुळेकर ठरले असून यांच्या घरी या बायोगॅस यंत्राचे स्थळ आणि ठिकाण निश्चित करून खड्याचे मोजमाप यावेळी देण्यात आले तर ते दोन दिवसांमध्ये यंत्र बसविण्यात येणार आहे.यामुळे ते बसविताच बायोगॅस वापरासाठी सुरु होतो. राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम अंतर्गत सन 2020 साठी लाभार्थ्यांना बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी केंद्र शासनाचे12 हजार व जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत पाच हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते तसेच अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना एक हजार रुपये अधिकचे अनुदान दिले जाते. या योजनेचा मुख्य उद्देश इंधनाची बचत करणे,लाकूडतोड टाळणे महिलांना धुरापासून होणारा त्रास टाळणे त्यांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे तसेच याद्वारे निघणारी जी स्लरी(कुजलेला खत)आहे ते उत्तम सेंद्रिय खत शेतीसाठी उपयोगात आणले जाते. यामुळे हे बायोगॅस प्रत्येक घरी बसवून घेण्याचे आवाहन कृषी विस्तार अधिकारी भोसले यांनी केले यावेळी ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी,शेतकरी धुळेकर, नंदकुमार फरताळे,बालाजी उबाळे आदी उपस्थित होते.
0 Comments