Latest News

6/recent/ticker-posts

सक्षम महिला, सदृढ बालक एक जनआंदोलन, महाविकास आघाडीच्या वतीने सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन साजरा करण्याच्या निर्णयांचे स्वागत

सक्षम महिला, सदृढ बालक एक जनआंदोलन, महाविकास आघाडीच्या वतीने सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन साजरा करण्याच्या निर्णयांचे स्वागत

लातुर:(प्रतिनिधी) महाविकास आघाडी सरकारच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला आहे,स्त्री शिक्षणातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि त्याचे कार्य समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचवण्याचा योग्य व सत्युत्य निर्णय घेतल्याबद्दल महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे, ना अजितदादा पवार, ना बाळासाहेब थोरात, ना अमित विलासराव देशमुख,ना यशोमतीताई ठाकूर,ना ओमप्रकाश उर्फ बचु कडु,ना संजय बनसुडे व महाविकास आघाडीच्या सर्व सहकाऱ्यांच्या पुढाकारातुन निर्णय घेतल्याबद्दल सक्षम महिला, सदृढ बालक एक जनआंदोलनच्या वतीने अँड प्रदिपसिंह गंगणे, बालाजी पिंपळे, प्रा दत्तात्रय खरटमोल, ताहेरभाई सौदागर, प्रा ओमप्रकाश झुरळे,जमालोद्दीन मणियार,आनंद पारसेवार,अँड सुहास बेंद्रे,अँड अभिजित मगर,किरण कांबळे, सौ अँड सुषमा गंगणे बेंद्रे,  सौ अँड छाया मलवाडे कुचमे, श्रीकांत गंगणे,सौ अँड शितल जाधव,प्रविण नाबदे, संतोष मस्के, डॉ अंबादास कारेपूरकर,भीमराव दूनगावे, साईनाथ घोणे, दिगंबर कांबळे आदींनी जाहीर आभार व स्वागत केले आहे.

Post a Comment

0 Comments