मुदत संपणा-या ग्रामपंचायतीची नामनिर्देशन पत्र 30 डिसेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत स्वीकारले जाणार
माहे एप्रील ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये मुदत संपणा-या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पारंपारीक पद्धतीने(offline mode) नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार
लातूर:(जिमाका) दि.29 - जिल्ह्यात माहे एप्रील ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्येे मुदत संपणा-या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पारंपारीक पद्धतीने(offline mode) नामनिर्देशनपत्र स्विकारणेबाबतचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांनी दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी एका पत्रकान्वये दिले असून त्यानुसार दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5:30 वाजेेेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती उप जिल्हाधिकारी(सा.) गणेश महाडिक यांनी दिली आहे.
या निवडणूक कार्यक्रमाबाबत नामनिर्देशनपत्र दाखल करताना दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळपासून काही तांत्रिक अडचणी येत असल्याामुळे इच्छूाक उमेदवार नामनिर्देशानापासून वंचीत राहू नये आणि त्यां्ना निवडणूक लढविण्या ची संधी मिळावी याकरीता राज्यन निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपारीक पद्धतीने (offline mode) स्विकारण्याूचा त्यानचप्रमाणे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याकची वेळ दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 05.30 वा. पर्यंत वाढविण्या चा निर्णय घेतला आहे.
त्याघअनुषंगाने लातूर जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीताना पारंपारीक पद्धतीने नामनिर्देशनपत्र स्वीहकारणे व वाढीव वेळेच्याि सूचना देण्यातची कार्यवाही करावी. त्यावचप्रमाणे नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुाक उमेदवारांना उपलब्धर होतील याची योग्यक ती व्यणवस्थाप करावी, असे निर्देश उप जिल्हाधिकारी महाडिक यांनी दिले आहेत.
राज्या निवडणूक आयोगाचे उपरोक्ती निर्देशानुसार पारंपारीक पद्धतीने स्विकारलेले नामनिर्देशनपत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी प्रक्रीया पूर्ण झाल्याननंतर वैध नामनिर्देशपत्र संगणक चालकांच्या मदतीने, संगणक प्रणालीमध्येर RO login मधुन भरुन घ्यासवयाचे आहे, याची नोंद घ्यागवी असे उप जिल्हाधिकारी महाडिक यांनी सूचित केले आहे.
0 Comments