Latest News

6/recent/ticker-posts

चाकुर तालुक्यात 25 लाखांचा गुटका जप्त;निखिल पिंगळे पोलीस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई

चाकुर तालुक्यात 25 लाखांचा गुटका जप्त;निखिल पिंगळे पोलीस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई

चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} अवैध रित्या गुटका विक्री करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.अहामदपुर तालुक्यात मागील कांही दिवसांपुर्वी गुटखा पकडुन जप्त करण्यात आला होता.चाकुर तालुक्यातील लातुररोड येथे ट्रकमध्ये 25 लाख रुपयांचा गुटखा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मंगळवारी[ता.29] पहाटे पकडला.लातुररोड ता.चाकुर येथे एक ट्रकमध्ये 25 लाख रुपयांचा गुटखा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मंगळवारी दि.29 रोजी पहाटे पकडला.या प्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.कर्नाटक राज्यातुन महाराष्ट्र विक्रीसाठी आणला जात होता.यांची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक गजानन क्षिरसागर,बालाजी अट्टरगे,बळंवत भोसले,दिनेश हावा,लक्ष्मण कोरे,प्रमोद गोरे,परमेश्वर अंकुलगे,नंदकीशोर शेंडगे,यांनी पहाटे तीनच्या सुमारास [एम.एच.12 केपी 5015] क्रमांकाच ट्रक पकडला.यात गोवा कंपनीचा गुटखा होता.हा ट्रक पोलीस ठाण्यात आणुन अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत यांची मोजणी करण्यात आली.24 लाख 84 हजार  गुटखा व दहा लाख रुपयाचा ट्रक जप्त करण्यात आला.याबाबत सुरक्षा अधिकारी दयानंद पाटील यांच्या फिर्यादीवरुन सुरेश वैद्यनाथ जाधव [रा.लंजवाड,ता.भालकी] रौफ रुक्मोद्दीन इनामदार [रा.केशर जवळगा,ता.उमरगा] ट्रक चालक रमेश रघुनाथ माने [ रा.पुणे] समीर शेख [रा.पुणे] जावेद पिराणी [रा.वसमत] या पाच जणां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलम घोरपडे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments