खरोशात राजकिय वातावरण तापले;ग्रामपंचायत निवङणुक- 2021
खरोसा:(प्रतिनिधि/श्रीकांत ङोके) राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे आजपासून आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे.दरम्यान गाव पुढारी तसेच स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी मोर्चेबांधणीला सुरवात सुध्दा केली आहे.यावर्षीचे खरोसा ग्रामपंचायतचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलेला सुटले असुन या निवङणुकीमध्ये चुरशीचा सामना पाहण्यास मिळणार आहे.तर खरोशात सर्वच पक्षांकङुन निवङणुकपूर्व तयारी जोरदार चालु असुन पॅनल उभारनी साठी गावतील पुढारी व तसेच कार्यकर्ते यांच्या बैठका चालु असुन, गावात सर्वञ राजकीय चर्चा चालु असल्याचे चिञ पाहण्यास येत आहे.खरोसा ग्रामपंचायतचा गुलाल हा शेवटी कोण उधळणार याकङे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments