धानोरा येथे 1 जानेवारीला रक्तदान शिबिराचे आयोजन
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) तालुक्यातील धानोरा येते नवीन वर्षाचे स्वागत धानोरा गावातील जनतेनी व सत्याई ग्रुप धानोरा च्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा पाहता मा.मुख्यमंत्री व मा.आरोग्यमंत्री यांनी रक्तदान करा असे आवाहन केले होते. धानोरा गावातील जनतेनी 2021 या नवीन वर्षाचे स्वागत " चला नवीन वर्षाचे स्वागत रक्तदानाने करू या " या संकल्पनेने करणार आहेत. रक्तदान करण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत व ग्रामपंचायत कार्यालय धानोरा येते रक्तदानाचे स्थळ आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करण्याचे आहवान अरुणा जाधव (सरपंच), मायाबाई आवले (उपसरपंच) , व्यंकट जाधव (चेयरमन वि.का.सो.धानोरा) , सुरेश जाधव (माजी सरपंच), गजाजन जाधव (ग्रा. प.सदस्य) गणेश माने (प्र.मुख्यध्यापक कै. रा.धा. वि.धानोरा) यांनी केले.
0 Comments