Latest News

6/recent/ticker-posts

कोविड योध्याचा अनोखा उपक्रम;नवविवाहित जोडीने केले 101 मास्कचे वाटप

कोविड योध्याचा अनोखा उपक्रम;नवविवाहित जोडीने केले 101 मास्कचे वाटप

निलंगा: (शहर प्रतिनिधी/इरफान शेख) आज सोमवारी सकाळी 11 वाजता निलंगा तालुक्यातील धानोरा येथील कै. राजाबाई धानोरकर विद्यालय धानोरा येते लग्नाचे औचित्य साधून कोविड योध्याने मास्क वाटप केले. मागील 6 महिण्यापासून कोविड केअर सेंटर ,लातूर येते कार्यरत असलेले कोविड योद्धा गजानन उत्तमराव जाधव व ममता गजाजन जाधव यांचे लग्न 7 डिसेंबर रोजी झाले होते. मास्क वापरणे हे काळाजी गरज बनली आहे कोरोना सारख्या महाभयंकर आजारामुळे अख्य जग संकटात आहे. कोरोना वाढता प्रभाव पाहता कोविड योद्धा गजाजन उत्तमराव जाधव , पत्नी ममता गजानन जाधव  व राज्य राखीव पोलीस बल गट क्र.-11 येते कार्यरत असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक व रा.रा.पोलीस बल ग्रुप-11 सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष रवी उत्तमराव जाधव, पत्नी मीरा रवी जाधव यांच्या हस्ते कै. राजाबाई धानोरकर विद्यालय धानोरा येते विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. सर्वच स्तरातून कोविड योद्धयाचा कौतुकाचा वर्षाव होत आहे याप्रसंगीं शाळेचे प्रभारी मुख्यध्यापक गणेश माने सर , पाटील सर , पार्थ रवी जाधव , रुद्राणी रवी जाधव व सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments