Latest News

6/recent/ticker-posts

नांदेडच्या धर्तीवर आता लातूरातही विद्यार्थ्यांसाठी 1 रूपयात शिक्षणाचा गुरूदक्षिणा पॅटर्न

नांदेडच्या धर्तीवर आता लातूरातही विद्यार्थ्यांसाठी 1 रूपयात शिक्षणाचा गुरूदक्षिणा पॅटर्न


अजित पाटील कव्हेकरांचा पुढाकार गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची झाली सोय
लातूर:(शहर प्रतिनिधी ओमकार गोटेकर) कोरोनाच्या संकटामुळे जग, देश, राज्य यासह लातूर जिल्हाही आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी, पालकांचे जीवन जगणेही अडचणीचे झालेलेे आहे. ही बाब लक्षात घेवून जेएसपीएमचे कार्यकारी संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी व गुरू शिष्यांची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी नांदेडच्या धर्तीवर आता लातूरातही अराईज अकॅमडीच्या माध्यमातून नीट एम्स,जेईई, एम.एच.टी.-सीईटी च्या विद्यार्थ्यांसाठी एक रूपया प्रवेश देण्याची गुरूदक्षिणा ऑफर सुरू करण्यात आली असून या विधायक उपक्रमाला विद्यार्थ्यांतून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांचा हा विधायक उपक्रम शिक्षणातील लातूर पॅटर्न, निर्माण करणार्या इतर अकॅडमीसाठी दिशादर्शक ठरणार आहे. जेएसपीएम संस्थेचे कार्यकारी संचालक तथा अराईज अकॅडमीचे सर्वेसर्वा अजितसिंह पाटील कव्हेकर हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये आग्रही असतात. मग ते वृक्षारोपन असो की घनकचरा व्यवस्थापन यात ते सक्रीयपणे योगदान देतात. त्यातही जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटातही त्यांनी कोरोनाग्रस्तांना तात्काळ मदत देण्याचे काम केलेले आहे. त्यांच्या कामाची दखल घेवून त्यांना कोरोना काळातही कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही सामाजिक बांधीलकी जपत जेएसपीएमच्या 38 युनिटच्या माध्यमातून गोर-गरीब व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी सुरू ठेवलेले आहे. याबरोबरच सामाजिक कार्यात भर पडावी, यासाठी नांदेडच्या धर्तीवर लातूरातही गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नीट एम्स,जेईई, एम.एच.टी.-सीईटी च्या विद्यार्थ्यांसाठी एक रूपयात शिक्षण देण्याचा संकल्प त्यांनी केला. आणि तो संकल्प पुर्तीस नेण्याचे काम त्यांचे लहान बंधू रंजितसिंह पाटील कव्हेकर हे करीत आहेत. स्पर्धेच्या युगात शिक्षण देणार्या अकॅडमीमध्येही दर्जेदार शिक्षण देण्याची सोय करण्यात आलेली आहे. परंतु हे शिक्षण गरीब विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. तसेच या क्लासेसवाल्यांच्या फीस सर्वसामान्यांना परवडणार्या नाहीत, हे वास्तव असतानाच कोरोनाचे संकट आल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी,पालक व विद्यार्थी यामध्ये होरपळून निघालेला आहे. त्यामुळे माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनातून, युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या संकल्पनेतून व रंजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या दुरदृष्टितून शहरातील उद्योग भवन परिसरात अराईज अकॅडमीची स्थापन करण्यात आली. या अकॅडमीच्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना एका रूपयात शिक्षण देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. यामध्ये 12 वीच्या 500 विद्यार्थ्यांना व 11 वीच्या 500 विद्यार्थ्यांना 1 रूपयात प्रवेश दिला जात आहे. तर रिपीटरच्या 100 विद्यार्थ्यांसाठी फक्त 3000 रूपये फिस ठेवून दर्जेदार शिक्षण देण्याचा निर्धार युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केलेला आहे, याची परीपुर्ती करण्यासाठी लातूर शहरातील लातूर अर्बन बँक, आईस फॅक्ट्री रोड, ट्युशन परिसरात अराईज अकॅडमीची सुरूवात माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी जि.प.अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, यांच्यसा पे्ररणेतून युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या संकल्पनेतून व रंजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या दुरदृष्टितून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मार्ग खुला करण्यात आलेला आहे. नांदेड नंतर लातूर पॅटर्न गाजविलेला लातूरातही या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भविष्यात लातूरचे गुणवंत विद्यार्थी देशात लातूरचे नाव करणार हे मात्र खरे.

Post a Comment

0 Comments