वडीलांच्या स्मरणार्थ कोरोना सेंटरला साहित्य भेट; सिनेट सदस्य अॅड. युवराज पाटील यांचा पुढाकार
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) वडीलांच्या वर्षश्राध्द निमीत्त होणार खर्च टाळून स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य अॅड. युवराज पाटील यांनी येथील कोरोना केअर सेंटरला डस्टबीन भेट दिल्या आहेत. येथील कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. तालूक्यात दिवसेनदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे यामुळे उपलब्ध साधनसामुग्री कमी पडत असल्यामुळे विविध साहित्य भेट देण्याचे आवाहन तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे यांनी केले होते यास प्रतिसाद देत चाकूर येथील प्रगती पतसंस्थेचे अध्यक्ष स्व. हणमंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ अॅड. युवराज पाटील यांनी डस्टबीन भेट दिल्या. तसेच रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डाॅ. एन. जी. मिर्झा, शैलेश पाटील यांच्या वतीने स्वच्छता किट देण्यात आल्या. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे उपस्थितीत हे साहित्य देण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे, वैदयकीय अधिक्षक डाॅ. दिपक लांडे, तालूका आरोग्य अधिकारी डाॅ. अर्चना पंडगे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदीवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी तोटेवाड, जेष्ठ पत्रकार प्रा. अ. ना. शिंदे, सुधाकर हेमनर, प्रशांत शेटे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस संगमेश्वर जनगावे, विकास स्वामी, गणेश स्वामी उपस्थित होते.
0 Comments